Suryakumar Yadav out of 1st round of Duleep Trophy 2024 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका या महिन्यापासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणार आहे. या मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादव उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी सामन्यांच्या पहिल्या फेरीत खेळू शकणार नाही. सूर्यकुमार मुंबईसाठी बुची बाबू निमंत्रण स्पर्धा तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन विरुद्ध कोईम्बतूर येथे खेळला. दुखापतीमुळे शेवटच्या डावात तो फलंदाजीला आला नव्हता.
सूर्यकुमार यादव उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी सामन्यांच्या पहिल्या फेरीत खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे तो शेवटच्या दिवशी फलंदाजीला येऊ शकला नाही. सूर्यकुमारला ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान अनंतपूरमध्ये इंडिया सी विरुद्ध इंडिया डी विरुद्ध खेळायचे आहे. याआधी तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. भारत अ आणि भारत ब यांच्यातील सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.
सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या पहिल्या फेरीला मुकणार –
सूर्यकुमार यादवने नुकताच भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा मानस व्यक्त केला होता. आता तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार का हा प्रश्न आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर निवड समिती संघ जाहीर करेल तेव्हाच मिळेल. पण कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपदही सूर्यकुमार यादवकडेच राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. तोपर्यंत सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानावर खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे.
सूर्यकुमार यादवने तयारीची संधी गमावली –
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यातून बाहेर पडल्यामुळे सूर्यकुमार यादवकडे तयारीची जी एक संधी होती, ती नक्कीच गमावली आहे. असो, भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. मात्र, देशांतर्गत स्पर्धांमध्ये ते नक्कीच हात आजमावत आहेत. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर ही मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होईल तेव्हा ती अनेक महिने सुरू राहणार आहे. दरम्यान, आता टीम इंडिया पुन्हा कधी मैदानात खेळताना दिसणार आहे, याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.