India tour of Ireland: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर दोन्ही संघ ३ वन डे आणि ५ टी२० सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. टीम इंडियाला वेस्ट इंडिजपाठोपाठ आयर्लंडचाही दौरा करायचा आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी२० सामने खेळणार आहे. टी२० विश्वचषक २०२२ पासून हार्दिक पांड्या भारतीय टी२० संघाची जबाबदारी सांभाळत आहे. पण चाहत्यांना आयर्लंड दौऱ्यावर नवीन कर्णधार पाहायला मिळू शकतो.

आतापासून खेळाडू होणार टी२० चा कर्णधार!

आयर्लंड दौऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आयर्लंड दौऱ्यावर युवा खेळाडूंनी भरलेला संघ पाठवू शकतो. दुसरीकडे, विश्वचषक आणि आशिया चषक पाहता हार्दिक पांड्यावरील कामाचा ताण सांभाळल्यामुळे त्याला या दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अद्याप काहीही असे काही जरी ठरलेले नसले तरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे आणि टी२० सामन्यांनंतर हार्दिकला विचारून यावरही निर्णय घेतला जाईल. हार्दिक वेस्ट इंडिज दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावेल तो १८ दिवसांत आठ सामने खेळेल.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीतची खरमरीत टीका! म्हणाली, “पुढच्या वेळी अशा हीन दर्जाच्या अंपायरिंगचा सामना करण्यासाठी…”

‘हा’ खेळाडू पांड्याची जागा घेऊ शकतो

हार्दिक हा भारतीय एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला टी२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव विंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत टीम इंडियाचा उपकर्णधारही असणार आहे. सूर्यकुमार यादवलाही यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाली होती.

रोहित-विराटला संधी मिळणे कठीण आहे

वृत्तानुसार, आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावाचा विचार केला जाणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचा चेहरा पूर्णपणे बदललेला दिसत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी२० विश्वचषक २०२२ नंतर एकही टी२० आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात १८, २० आणि २३ ऑगस्ट रोजी टी२० मालिका होणार आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहचे देखील आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियात दुखापतीनंतर पुनरागमन होऊ शकते.

हेही वाचा: IPL 2024 Auction: यंदाच IPL लाखमोलाच, खेळाडूंना लागणार लॉटरी! प्रत्येक संघाच्या पर्समध्ये वाढले तब्बल ‘इतके’ कोटी

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात येणार आहे

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विक्रम राठोड (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.