India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. भारतीय संघाची डाव २६ षटकांत ११७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघासमोर ११८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या दरम्यान सूर्यकुमार यादवने एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली.
या सामन्यात सूर्यकुमार यादवसह भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. कारण सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर एलबीडब्ल्यू आऊट झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या वनडेत पुन्हा एकदा त्याच शैलीत स्टार्कने त्याला बाद केले.
सूर्यकुमार हा टी-२० मध्ये हिट फलंदाज असला तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सातत्याने निराशा करत आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या १२ डावांमध्ये ७०.५०च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटच्या १२ डावांमध्ये त्याने फक्त १२.६३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
द्रविड, गांगुली, भज्जी आणि युवराज सिंगसह लज्जास्पद यादीत सामील –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सलग दोन सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव राहुल द्रविड, सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत सामील झाला. सूर्यकुमार यादवपूर्वी हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दोनदा शून्यावर आऊट झाले आहेत.
हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: स्मिथने हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच! हार्दिक पांड्याही झाला अवाक्, पाहा VIDEO
राहुल द्रविडने २००७ मध्ये, सौरव गांगुलीने २००७ मध्ये, हरभजन सिंगने २००९ मध्ये आणि युवराज सिंगने २०१३ मध्ये बाद झाले होते. आता दहा वर्षांनंतर म्हणजेच २०२३ मध्ये, सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दोनदा शून्यावर बाद होणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दोनदा शून्यावर बाद झालेले भारतीय फलंदाज –
राहुल द्रविड – (२००७)
सौरव गांगुली-(२००७)
हरभजन सिंग – (२००९)
युवराज सिंग-(२०१३)
सूर्यकुमार यादव-(२०२३)
मिचेल स्टार्कचा धमाका –
मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलिया संघाकडून शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या पाचपैकी पाच विकेट एकट्याने घेतल्या. ज्यामध्ये त्याने शुबमन गिल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोहम्मद सिराजला बाद करत त्याने भारतीय संघाचा डाव गुंडाळला.