भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार शतकी खेळी केली. त्यानंतर भारताने ६५ धावांनी विजय मिळवला. यादवच्या या शतकानंतर सोशल मीडियावर लोक त्याच्या खेळीचे कौतुक करत आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीनेही सूर्यकुमार यादवसाठी एक खास ट्विट केले आहे. ज्यावर सूर्यानेही सामन्यानंतर बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर सूर्यकुमारला विराट कोहलीच्या ट्विटबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, “मला विराट कोहलीसोबत फलंदाजी करताना मजा येते, आम्हाला खूप मजा येते, मी त्याचे ट्विट एका मोठ्या कौतुकाच्या रुपाने घेतो आणि भविष्यात आणखी सुधारणा करेन.”
खरंतर विराट कोहलीने सूर्याच्या शतकी खेळीची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. ”विराटने आपल्या ट्विटच्या सुरुवातीला एक इटालियन शब्द लिहिला आहे, न्यूमेरो यूनो, नंतर लिहिले की न्यूमेरो यूनो दाखवत आहे की तो जगातील सर्वोत्तम का आहे? मी लाईव्ह पाहू शकलो नाही. पण मला खात्री आहे की तो त्याच्यासाठी पुन्हा एकदा व्हिडीओ गेम इनिंग असेल.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना रविवारी बे ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने शानदार शतक झळकावले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १२६ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने हा सामना ६५ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.