डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या छोटेखानी दौऱ्यावर भारतीय संघ तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली होती. या संघात निवड झालेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन नवीन नावांना संधी मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची अधिकृत घोषणा नुकतेच केली.
टीम इंडियाचा आता उद्यापासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून किवी संघाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. २०२२ या वर्षात सूर्यकुमार यादवपेक्षा इतर दुसऱ्या भारतीय खेळाडूने जास्त धावा केल्या नाहीत. तरी देखील त्याला बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले. भारताचा स्फोटक ३६० डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. निवडकर्त्यांचा सूर्यकुमार विश्वास संपादन करू शकला नाही असे शक्यच नाही, असे त्याचे चाहते म्हणत आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयावर काही चाहत्यांनी आगपाखड देखील केली.
आशिया चषकात झालेल्या दुखापतीतून जडेजा अद्याप सावरलेला नाही. शस्त्रक्रियेनंतर त्याला आणखी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्याच्या जागी वनडे संघात बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमद याची वर्णी लागली. दुसरीकडे एकदिवसीय संघात प्रथमच निवड झालेला उत्तर प्रदेशचा उमदा वेगवान गोलंदाज यश दयाल हा पाठीच्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकणार आहे. त्याच्याजागी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याची निवड केली आहे. यासोबतच भारत अ संघाची देखील घोषणा केली गेली.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.