Suryakumar Yadav: दुखापतीने त्रस्त असलेल्या सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२४ पूर्वी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. सूर्याने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो नेटमध्ये जोरदार फलंदाजी करताना दिसला. व्हिडीओ पाहिल्यानंतर, असे दिसते की सूर्यकुमार त्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आगामी आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
सूर्या कधी जखमी झाला?
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव दुखापतीचा बळी ठरला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारत-अफगाणिस्तान मालिकेत सहभागी होणार नाही. उल्लेखनीय आहे की सूर्यकुमार यादव आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. याशिवाय टी-२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मिस्टर ३६० डिग्रीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा पराभव केला. त्यांचे सध्या एनसीएमध्ये तो त्याच्या तंदुरुस्तीवर भर देत आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर राहिले
आता सूर्या अफगाणिस्तान भारत विरुद्ध अफगाणिस्तान विरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर आहे. याबरोबरच त्याला स्पोर्ट्स हर्नियाचाही त्रास आहे, त्यासाठी त्याची त्यावर शस्त्रक्रिया देखील झाली आहे. अशा परिस्थितीत तो काही काळ मैदानापासून दूर राहणार आहे. आता सूर्याचे आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन अपेक्षित आहे.
संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने सरावा करतानाच व्हिडीओ शेअर केला
पायाच्या दुखापतीच्या पुनर्वसन दरम्यान सूर्याने आता त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे. सूर्याच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सूर्याच्या लवकरच पुनरागमनाची आशा चाहत्यांनी व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे. सूर्या या वर्षी जूनमध्ये कॅरेबियन भूमीत आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषक संघाचा महत्त्वाचा भाग आहे. भारताच्या कर्णधारावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माने जवळपास वर्षभरानंतर टी-२० फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन
रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर आता त्याच्याकडून विश्वचषकाचे नेतृत्व अपेक्षित आहे. दरम्यान, ऋषभ पंत मैदानाबाहेर गेल्यानंतरही यष्टीरक्षकावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता सूर्या कधी मैदानात परततो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील दुसरा सामना इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-२० सामना खेळू शकला नाही आणि त्यामुळे कोहली वर्ल्ड कप २०२२ नंतर थेट या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.