Suryakumar Yadav’s Insta Story Viral : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ साठी हार्दिक पंड्याला कर्णधार नियुक्त केले आहे. मुंबईने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पंड्याकडे सोपवले आहे. यामुळे करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्स संघात ट्रेड करण्यात आले, तेव्हा बुमराहने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एमआयला अनफॉलो केले होते. आता हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर सूर्यकुमार यादवची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक ‘हार्ट ब्रेक’चा इमोजी शेअर केला आहे. याबाबत असे मानले जाते की, रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिकला दिल्यामुळे सूर्याचे मन दु:खी झाले आहे.

सूर्यकुमार यादव झाला दु:खी –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. अशा परिस्थितीत रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार बनवण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण मुंबईने हार्दिक पंड्याला कर्णधार नियुक्त केले आहे. कदाचित यामुळे किंवा रोहित पायउतार झाल्यामुळे सूर्याचे मन दु:खी झाले असेल. म्हणून त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘हार्ट ब्रेक’चा इमोजी शेअर केला असावा, असा अंदाज चाहते लावत आहेत.

Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : वाल्मिक कराडवर मकोका लागला असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक – जरांगे पाटील
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
Who is Devajit Saikia who was elected as the BCCI Secretary after Jay Shah
Devajit Saikia : कोण आहेत देवजीत सैकिया? जय शाहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी झाली निवड
Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
सूर्यकुमार यादवची इन्स्टा स्टोरी व्हायरल

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पंड्याला कर्णधार नियुक्त केल्याची माहिती दिली आहे. मुंबईने निवेदनात लिहिले की, ‘मुंबई इंडियन्स आज कर्णधार बदलाची घोषणा करत आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पुढच्या सत्रात कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत यश मिळवले आहे.’ संघाने लिहिले की, आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. २०१३ पासून आतापर्यंतचा त्याचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.

हेही वाचा – IND vs SA: एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियात मोठे फेरबदल? प्रशिक्षकपदी द्रविड दिसणार नाही?

रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरी –

रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन ठरला आहे. मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि ४२ अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल २००८ मध्‍ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्याने डेक्कन चार्जेसकडून खेळताना पदार्पण केले होते.

Story img Loader