Syed Mushtaq Ali Trophy 2024: एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज तंबूत परतलेले असताना सूर्यांश शेडगेने दडपणाच्या स्थितीत १५ चेंडूत ३६ खेळी करत मुंबईला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं. मुंबईने मध्य प्रदेशला ५ विकेट्स आणि १३ चेंडू राखून नमवत जेतेपद पटकावलं. १७५ धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना मुंबईची अवस्था १२९/५ अशी झाली होती. मात्र यानंतर सूर्यांश शेडगेने सूत्रं हाती घेतली. त्याने १५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. सूर्यांशला अथर्व अंकोलेकरने ६ चेंडूत २ षटकारांसह १६ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १९ चेंडूत ५१ धावांची खणखणीत भागीदारी केली.

बंगळुरूतील एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या लढतीत मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शार्दूल ठाकूरने मध्य प्रदेशच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडलं. सुभ्रांशू सेनापती आणि हरप्रीत सिंग यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. काही दिवसांपूर्वीच आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल २३.७५ कोटी रुपयांची बोली लागलेल्या वेंकटेश अय्यरने १७ धावांचं योगदान दिलं. पण मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने ४० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ८१ धावांची तडाखेबंद खेळी केली. रजतच्या या खेळीच्या बळावर मध्य प्रदेशने १७४ धावांची मजल मारली. मुंबईतर्फे शार्दूल ठाकूर आणि रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
Mohammed Shami brilliant bowling for Bengal in Vijay Hazare Trophy ahead Champions Trophy 2025
Mohammed Shami : मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज! पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
Rishabh Pant Fastest Fifty by a visiting batter on Australian soil in Just 29 Balls IND vs AUS Sydney test
IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने पृथ्वी शॉ याला झटपट गमावलं. पृथ्वीने १० धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर १६ धावा करून तंबूत परतला. संपूर्ण स्पर्धेत झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या अजिंक्य रहाणेने सूर्यकुमार यादवच्या साथीने डाव सावरला. या अनुभवी शिलेदारांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. वेंकटेश अय्यरने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. रहाणेने ३० चेंडूत ३७ धावांची खेळी केली. शिवम दुबेने आक्रमक सुरुवात केली पण कुमार कार्तिकेयने त्याला फसवलं. दुबे ९ धावा करून तंबूत परतला. शिवम शुक्लाच्या गोलंदाजीवर स्वीप करण्याचा सूर्यकुमारचा प्रयत्न अवेश खानच्या हातात जाऊन विसावला. सूर्यकुमारने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. सूर्यकुमारच्या विकेटमुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र सूर्यांश शेडगेने दडपणाखाली शांतपणे आक्रमक खेळी साकारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या खेळाडूंच्या आशा उंचावल्या होत्या. पण सूर्यांशने चौकार-षटकारांची लयलूट करत त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा शिल्पकार

मुंबईने या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवलं. आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयसने मुंबईलाही जेतेपद मिळवून दिलं. दोन वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अजिंक्य रहाणेने स्पर्धेत सर्वाधिक ४६९ धावा केल्या. त्याने ९ सामन्यात सातत्याने धावा केल्या. त्याने स्पर्धेत ५ अर्धशतकी खेळी साकारल्या. रहाणेलाच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने ४२८ धावा केल्या. चंदीगढच्या जगजीत सिंगने स्पर्धेत सर्वाधिक १८ विकेट्स पटकावल्या.

मुंबईचा जेतेपदापर्यंतचा प्रवास

वि. गोवा- २६ धावांनी विजयी
वि. महाराष्ट्र- ५ विकेट्सनी विजयी
वि. केरळ- ४३ धावांनी पराभूत
वि. नागालँड- ७ विकेट्सनी विजयी
वि. सर्व्हिसेस-३९ धावांनी विजयी
वि. आंध्र प्रदेश- ४ विकेट्सनी विजयी
वि. विदर्भ- ६ विकेट्सनी विजयी
वि. बडोदा- ६ विकेट्सनी विजयी
वि. मध्य प्रदेश- ५ विकेट्सनी विजयी

Story img Loader