Surykumar Yadav react on Kolkata Doctor Rape and Murder Case : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटीही वेगवेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. आता भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा संदेश आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केला आहे.
‘तुमच्या मुलाला शिक्षित करण्याची गरज’ – सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यानी एक खास संदेश दिला आहे. त्याने जुनी समज बदलण्याबद्दल आवाहन केले आहे. त्यानी स्टोरीमध्ये लिहिलं की, ‘तुमच्या मुलीचे रक्षण करा’ ही संकल्पना चुकीची असल्याचे म्हटलं आहे. कारण आता ‘तुमच्या मुलाला सज्ञान करण्याची गरज आहे’ यावर जोर दिला आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने आपल्या भावाला, पतीला, मित्राला आणि वडिलांना सज्ञान करण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.
सौरव गांगुलीकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी –
याआधी रोहित शर्मा आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनीही आरजी हत्याकांड बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सौरव गांगुलीनेही या प्रकरणी यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. सौरव गांगुली म्हणाला होता, मला आशा आहे की दोषींची ओळख पटवून त्यांना शिक्षा होईल. ज्या पद्धतीने लोक निषेध करत आहेत, ही घटना जगात कुठेही घडली असती तर लोकांनी त्याच पद्धतीने आवाज उठवला असता. कारण ही खूप दुर्दैवी घटना आहे, त्यामुळे कठोर कारवाई व्हायला हवी.
प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग –
पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे, त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.