ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमधून सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताला भारतीय कुस्ती महासंघाने इन्कार केला आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू कोणत्या वजनी गटामधून खेळणार आहेत, याची संभाव्य खेळाडूंची आयओएला पाठवायची असते. या संभाव्य यादीमध्ये सुशीलचे नाव नाही, पण याचा अर्थ सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, असा होत नाही.
‘‘संभाव्य खेळाडूंची यादी भारतीय कुस्ती महासंघाने पाठवलेली नव्हे तर संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने पाठवलेली आहे. जेव्हा सर्व पात्रता फेरी पूर्ण होतील, त्यानंतर जागतिक संघटना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी करणार आहे आणि ही यादी ऑलिम्पिक महासंघाला पाठवली जाणार आहे,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘ऑलिम्पिकमध्ये सुशील जाणार की नरसिंग याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. हा निर्णय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष घेणार आहेत. त्याचबरोबर या ऑलिम्पिकमधील प्रवेशासाठी या दोन्ही कुस्तीपटूंमध्ये स्पर्धा घेण्यात येणार का, याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, हा प्रश्नच उपस्थित होत नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा