ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळविणाऱ्या सुशील कुमार या कुस्तीगिराचा तसेच त्याचे प्रशिक्षक यशवीर सिंग यांचा रुस्तुम-ए-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेनिमित्त गौरव केला जाणार आहे. ही स्पर्धा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कात्रा येथे होणाऱ्या या स्पर्धेत जागतिक कनिष्ठ कांस्यपदक विजेता सत्यव्रत, हिंदकेसरी युधवीर सिंग व आशियाई कनिष्ठ कांस्यपदक विजेता प्रवीण कुमार आदी नामवंत खेळाडू येथील स्पर्धेत भाग घेत आहेत. या स्पर्धेत इंग्लंड, युक्रेन, बेलारुस या देशांतील खेळाडूंनीही आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय मल्लांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, पंजाब, रेल्वे, सीमा सुरक्षा दल, हिमाचल प्रदेश आदी संघांमधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेतील मुख्य कुस्तीमधील विजेत्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर उपविजेत्या खेळाडूस ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या खेळाडूंना अनुक्रमे ३० हजार व २० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.
जम्मू-काश्मीरमधील कुस्ती स्पर्धेत सुशील कुमारचा गौरव करणार
ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळविणाऱ्या सुशील कुमार या कुस्तीगिराचा तसेच त्याचे प्रशिक्षक यशवीर सिंग यांचा रुस्तुम-ए-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेनिमित्त गौरव केला जाणार आहे.
First published on: 09-10-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumar will honoured in jammu kashmir wrestling championships