ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांचे कौशल्य घरच्या आखाडय़ात पाहण्यापासून भारतीय कुस्ती चाहते वंचित राहणार आहेत. १८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत हे दोन्ही मल्ल दुखापतीमुळे सहभागी होणार नाहीत. सुशील व योगेश्वर यांच्याऐवजी अमित धानकर (६६ किलो) व बजरंग (६० किलो) हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, हे दोन्ही खेळाडू अद्याप दुखापतींमधून तंदुरुस्त झालेले नाहीत.
ही स्पर्धा फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला या तीन गटांमध्ये होत असून त्यामध्ये १९ देशांचे २२५ हून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत. त्यामध्ये चीन, जपान, कझाकिस्तान या देशांमधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धा : सुशील, योगेश्वरची अनुपस्थिती
ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांचे कौशल्य घरच्या आखाडय़ात पाहण्यापासून भारतीय कुस्ती चाहते वंचित राहणार आहेत. १८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत हे दोन्ही मल्ल दुखापतीमुळे सहभागी होणार नाहीत.
First published on: 16-04-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushil kumar yogeshwar dutt to miss asian wrestling championship