ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांचे कौशल्य घरच्या आखाडय़ात पाहण्यापासून भारतीय कुस्ती चाहते वंचित राहणार आहेत. १८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आशियाई वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत हे दोन्ही मल्ल दुखापतीमुळे सहभागी होणार नाहीत. सुशील व योगेश्वर यांच्याऐवजी अमित धानकर (६६ किलो) व बजरंग (६० किलो) हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, हे दोन्ही खेळाडू अद्याप दुखापतींमधून तंदुरुस्त झालेले नाहीत.
ही स्पर्धा फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला या तीन गटांमध्ये होत असून त्यामध्ये १९ देशांचे २२५ हून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत. त्यामध्ये चीन, जपान, कझाकिस्तान या देशांमधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा