India vs Afghanistan 1st T20 Match: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना उद्या संध्याकाळी ७:०० वाजता मोहालीच्या आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक मजबूत संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे, ज्यात विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारत कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह खेळतो, ते पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलामीवीर फलंदाजी जोडी

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासह सलामीला येऊ शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी कशी कामगिरी करते, त्यावर विश्वचषकातील रणनीती ठरणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल पॉवर प्ले किती मध्ये धावा करतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. अशा स्थितीत शुबमन गिलला संघातून मधून बाहेर बसावे लागू शकते.

मध्यम क्रम फलंदाज

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. भारतीय संघ व्यवस्थापन तिलक वर्माला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. फिनिशर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: भारत-अफगाणिस्तान प्रथमच टी-२० द्विपक्षीय मालिका खेळणार, दोन्ही संघाची काय आहे आकडेवारी?

अष्टपैलू खेळाडू

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेलला ७व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाईल. अक्षर पटेल टीम इंडियाला फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही मजबूत करेल.

गोलंदाजी विभाग

चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा फिरकी गोलंदाजी विभागात समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात कुलदीप यादव अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठा धोकादायक ठरू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांपैकी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंगला संधी देऊ शकतात.

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: मोहालीतील धुक्यामुळे भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा १५ सदस्यीय संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान: इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल-हक-फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspense on players playing in the entire t20 series against india difficult to be included in the playing 11avw