वृत्तसंस्था, चॅटॅरॉक्स

उपाशी पोटी आणि हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांसह धैर्याने अतुलनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेने भारताला पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील तिसरे पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पदार्पणात कोल्हापूरच्या स्वप्निलने फार अवघड मानल्या जाणाऱ्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करतानाच इतिहास रचला. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

shashank singh retained by punjab kings
IPL 2025 Retention: पंजाबला ‘शशांक’ पावला- चुकून खरेदी, संधीचं सोनं आणि थेट रिटेन
IPL 2025 Players Retention Highlights in Marathi| IPL 2025 Retained & Released Players List Squad
IPL 2025 Retention Highlights : हेनरिक क्लासेन ठरला…
ruturaj gaikwad
India A vs Aus A: युवा टीम इंडियाचा १०७ धावांत खुर्दा; यजमानांचीही डळमळीत सुरुवात
ben stokes obe award
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरी चोरी
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
IPL 2025 DC Retention Team Players List
DC IPL 2025 Retention: ऋषभ पंत दिल्लीच्या ताफ्यातून रिलीज, अक्षर पटेलला मोठी रक्कम
IPL 2025 CSK Retention Team Players List
CSK IPL 2025 Retention: ऋतुराज-जडेजाला मोठी रिटेंशन किंमत, धोनी अनकॅप्ड खेळाडू; चेन्नईने कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?
IPL 2025 SRH Retention Team Players List
SRH IPL 2025 Retention: सर्वात मोठी रक्कम! हेनरिक क्लासेनला २३ कोटींमध्ये केलं रिटेन, हैदराबादने भुवनेश्वर कुमारला केलं रिलीज
IPL 2025 PBKS Retention Team Players List
PBKS IPL 2025 Retention: पंजाब किंग्ज संघाचा होणार कायापालट, लिलावात चुकून घेतलेल्या खेळाडूसह फक्त एकाला केलं रिटेन

तसेच महाराष्ट्रासाठीही हे पदक खास ठरले. १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमधील खाशाबा जाधव यांच्या कुस्तीतील कांस्यपदकानंतर ७२ वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदकवीर गवसला. गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत स्वप्निलने ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील हे भारताचे तिसरे पदक ठरले.

हेही वाचा >>>PV Sindhu : पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का; ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकली, बिंग जियाओने घेतला बदला

संयम निर्णायक

आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत स्वप्निलसमोर विश्वविक्रमवीर चीनचा लिऊ युकुन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला चेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरातस्की आदींचे आव्हान होते. लिऊने अपेक्षित कामगिरी करताना ४६३.६ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. युक्रेनचा सेरी कुलिश (४६१.३) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी स्वप्निल आणि जिरी प्रिवरातस्की यांच्यात स्पर्धा सुरू होती. अखेर स्वप्निलने राखलेला संयम निर्णायक ठरला. स्वप्निलने ४५१.४ गुणांसह कांस्यपदक मिळवले. तो एकवेळ सहाव्या स्थानापर्यंत घसरला होता. परंतु त्याने कलामीची जिद्द दाखवली.

ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पदक जिंकणारा स्वप्निल भारताचा पहिलाच नेमबाज आहे. याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर ‘प्रोन’ (पोटावर झोपून वेध साधणे) प्रकारात जॉयदीप कर्माकर चौथा आला होता. पुढे ऑलिम्पिकमधून ५० मीटर ‘प्रोन’ हा प्रकार वगळण्यात आला आणि त्याची जागा थ्री-पोझिशन प्रकाराने घेतली. थ्री-पोझिशन प्रकारात मांडीवर बसून (नीलिंग), मग पोटावर झोपून (प्रोन) आणि शेवटी उभे राहून (स्टँडिंग) वेध घेतला जातो.