स्वराज क्लबने पेनिनसुला करंडक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच राखली. त्यांनी पुणे युनायटेड संघावर २-० असा विजय मिळविला. ढोबरवाडी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वराज क्लबकडून परवेझ शेख यानेच दोन्ही गोल करीत सिंहाचा वाटा उचलला.
अन्य लढतीत अशोका स्पोर्ट्स क्लबने संगम स्पोर्ट्स संघावर २-१ असा निसटता विजय मिळविला. त्यावेळी विजयी संघाकडून करमिंदर याने दोन गोल केले. पराभूत संघाकडून एकमेव गोल करण्याचा मान तेजस जोशी याला मिळाला.
चेतक स्पोर्ट्सने अपराजित्व राखताना डेक्कन इलेव्हन ‘क’ संघाला ३-० असे पराभूत केले. चेतक संघाकडून अजिंक्य यादव, गौरव देशपांडे व गौरव पोनप्पा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
डीएमआर संघाने फिनिक्स ‘क’ संघाचा २-० असा पराभव केला. डीएमआर संघाचे हे गोल अदनान शेख व जयंत साळुंके यांनी केले. 

Story img Loader