रेल्वेची स्वाती सिंग व ओंकार ओतारी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटात एकूणात सुवर्णपदकजिंकून वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.  स्वातीने ५३ किलो वजनी गटात १७६ किलो वजन उचलले. तिने स्नॅचमध्ये सुवर्ण व क्लिन-जर्कमध्ये रौप्यपदक मिळविले. हरयाणाच्या प्रीति कुमारीने क्लिन-जर्कमध्ये सुवर्णपदक जिंकले. पोलिस दलाच्या तिकिना डे हिने स्नॅचमध्ये रौप्यपदक मिळविले. पुरुषांच्या ६९ किलो गटात ओंकार ओतारी याने एकूण २८४ किलो वजन उचलले व सुवर्णपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये १३१ किलो वजन उचलून सुवर्णवेध घेतला. क्लिन-जर्कमध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा