Saweety Boora on Deepak Hooda Latest News : हरियाणाची वर्ल्ड चँपियन बॉक्सर स्विटी बुरा आणि तिचा पती आणि कबड्डीपटू दीपक हुड्डा यांच्यातील वादाने कळस गाठला आहे. स्विटीचा पतीला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता तिने तिचा पती दीपक हुड्डा गे असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय म्हटलं आहे स्विटी बुराने?
माझा पती गे आहे, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. मला त्याने व्हिडीओ दाखवण्यासाठी बोलावले होते. मात्र, व्हिडीओचा सुरुवातीचा आणि शेवटचा हिस्सा कट करण्यात आला. कट करण्यात आलेल्या भागात दीपकने मला शिवीगाळ केली होती. त्यानंतर मला पॅनिक अटॅक आला होता. पुढे बोलताना स्वीटीने आरोप केलाय की, एसपीही दीपकसह मिळालेला आहे. दोघांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझी चूक काय आहे? मी घटस्फोट मागितला ही माझी चूक आहे का? मी एक मुलगी आहे ही माझी चूक आहे का? असेही प्रश्न तिने उपस्थित केले आहेत.
दीपक हुड्डाने पैसे घेतल्याचाही आरोप
स्विटीने हात जोडून व्हिडीओ केला आहे आणि सांगितलं आहे की मला फक्त घटस्फोट हवा आहे. मी त्याच्याकडे त्याची मालमत्ता मागितली नाही, पैसेही मागितलेले नाहीत. दीपकनेच माझ्याकडून पैसे घेतले आहेत. असाही आरोप तिने केला आहे.
काय आहे हे प्रकरण?
स्विटी बुरा आणि दीपक हुड्डा यांचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं. स्विटी बुराने पत्रकार परिषद घेऊन दीपक हुड्डा याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. पतीच्या छळामुळे तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले होते. ती इतकी तणावामध्ये आहे की जेव्हाही दीपकचा आवाज तिला ऐकू येतो तेव्हा तिला पॅनिक ॲटॅक येतो. तसेच तिला काही झालं तर तिच्या मृत्यूला दीपक हुडा आणि हिसारचे एसपी जबाबदार असतील असेही म्हटले आहे. स्विटीच्या म्हणण्यानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी दीपकची भेट घेतली आहे आणि कारवाई केली जात आहे.
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वीटीने दीपक आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्याच्या मागणीवरून छळ, अपमान आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीत तिने आरोप केला आहे की तिच्या कुटुंबाने लग्नासाठी सुमारे १ कोटी रुपये हुंडा दिला, ज्यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी फॉर्च्युनर एसयूव्हीची मागणी पूर्ण करण्यासाठी घेतलेले ११.५९ लाख रुपयेही आहेत. २०१६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या कबड्डीच्या भारतीय संघाचा दीपक हुडा भाग होता.