मुंबईसह राज्यभरातल्या जलतरणपटूंसाठी रविवारचा दिवस खास असणार आहे. निमित्त आहे स्विमॅथॉन अर्थात सागरी जलतरण स्पर्धेचे. राज्यभरातील ६०० स्पर्धक स्विमॅथॉनसाठी सज्ज झाले असून, यावर्षी १० ते १२ वयोगटातील मुलांसाठी विशेष सबज्युनिअर गट तयार करण्यात आला आहे. २०२० ऑलिम्पिक स्पर्धेचा विचार करून या गटाची निर्मिती करण्यात आली आहे. १४ विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, अपंगांसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. अनेक वर्षांचा इतिहास असलेली ही स्पर्धा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खंडित झाली होती. मात्र गेल्या वर्षीपासून ‘स्विमॅथॉन’ या नावाने ही स्पर्धा पुनरुजीवित करण्यात आली. संक रॉक ते गेटवे हे पाच किलोमीटरचे अंतर कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी जबरदस्त चुरस रंगणार आहे. या स्पर्धेला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते तरन्थ शेणॉय, राष्ट्रीय विजेते कुणाल हेंद्रे आणि जलतरणातील पहिला अर्जुन पुरस्कार विजेता अविनाश सारंग उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा