उपांत्यपूर्व फेरीत धडक; रामोसची हॅट्ट्रिक, रोनाल्डोची पाटी कोरी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृत्तसंस्था, लुसेल : ख्रिस्तियानो रोनाल्डोविनाही आपण जिंकण्यात सक्षम असल्याची ग्वाही देताना पोर्तुगालने स्विर्त्झंलडचा ६-१ असा धुव्वा उडवत ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालच्या या मोठय़ा विजयाइतकीच प्रशिक्षक फर्नाडो सँटोस यांनी रोनाल्डोला राखीव खेळाडूंत बसवण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाची चर्चा रंगली.
तारांकित आघाडीपटू रोनाल्डोचा सामन्यातील सहभाग केवळ १७ मिनिटांचा राहिला. सामन्याच्या ७३व्या मिनिटाला प्रशिक्षक सँटोस यांनी रोनाल्डोला मैदानात उतरवले. मात्र, तोपर्यंत पोर्तुगालने पाच गोल नोंदवले होते. पोर्तुगालच्या विजयात २१ वर्षीय आघाडीपटू गोन्कालो रामोसची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. रामोसने १७, ५१ आणि ६७व्या मिनिटाला गोल करताना हॅट्ट्रिक नोंदवली. विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिकची नोंद करणारा रामोस हा पेले यांच्यानंतरचा सर्वात युवा खेळाडू ठरला. पोर्तुगालकडून पेपे (३३व्या मिनिटाला), राफाएल गरेरो (५५व्या मि.) आणि राफाएल लेआओ (९२व्या मि.) यांनी अन्य गोल केले. स्विर्त्झंलडचा एकमेव गोल मॅन्युएल अकांजीने ५८व्या मिनिटाला केला.
साखळी फेरीतील कोरियाविरुद्धच्या पराभवात रोनाल्डोला अखेरच्या टप्प्यात प्रशिक्षक सँटोस यांनी बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोनाल्डोने मैदान सोडताना प्रशिक्षकांच्या निर्णयाविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली होती. संघापुढे खेळाडू मोठा नाही असा स्पष्ट संदेश देत सँटोस यांनी स्विर्त्झंलडविरुद्ध रोनाल्डोला राखीव खेळाडूंत बसवले. मात्र, याचा फारसा परिणाम पोर्तुगालच्या कामगिरीवर झाला नाही. पोर्तुगालसाठी नवा नायक उदयाला आला. क्लब फुटबॉलमध्ये बेन्फिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामोसला विश्वचषक स्पर्धेत प्रथमच सामन्याची सुरुवात करण्याची संधी मिळाली. रामोसने या संधीचे सोने केले. रामोसने संघाचे खाते उघडल्यावर कर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या पेपेने दुसरा गोल केला. चेंडूचे नियंत्रण राखण्यापेक्षा आक्रमण हा सर्वोत्तम बचाव मानून खेळणाऱ्या पोर्तुगालने स्विर्त्झंलडवर कायम दडपण ठेवले.
मध्यंतराला पोर्तुगालची आघाडी २-० अशी होती. उत्तरार्धाची सुरुवात तेवढीच आक्रमक करणाऱ्या पोर्तुगालने चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल नोंदवत आपले मनसुबे स्पष्ट केले. प्रथम ५१व्या मिनिटाला रामोर आणि नंतर ५५व्या मिनिटाला गरेरोने गोल केला. ६७व्या मिनिटाला गोल करून रामोसने हॅट्ट्रिक साजरी केली. अखेरच्या टप्प्यात रोनाल्डो मैदानात उतरला, तेव्हा लुसेल स्टेडियम रोनाल्डोच्या नावाने गरजून गेले होते. अवघ्या १७ मिनिटांच्या खेळात रोनाल्डोला गोल करण्याची संधी होती, पण तो ‘ऑफसाइड’ ठरल्याने हा गोल अपात्र ठरला. त्यामुळे रोनाल्डोची पाटी कोरीच राहिली. भरपाई वेळेतही पोर्तुगालने आक्रमण सोडले नाही. भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला लेआओने उजव्या बाजूने जोरदार किक मारत पोर्तुगालचा सहावा गोल नोंदवला.
सर्वात युवा आणि वयस्क खेळाडू
पोर्तुगालसाठी सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून खेळण्याची संधी मिळाल्यावर हॅट्ट्रिक करणारा २१ वर्षीय गोन्कालो रामोस सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. त्याच वेळी पेपे विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत गोल करणारा (३९ वर्षे २८३ दिवस) सर्वात वयस्क खेळाडू आहे.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरीत सहा किंवा त्याहून अधिक गोल करणारा पोर्तुगाल २१व्या शतकातील दुसराच संघ ठरला. यापूर्वी जर्मनीने २०१४च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्ध (७-१) अशी कामगिरी केली होती.
पोर्तुगालला तिसऱ्यांदा (१९६६ व २००६ नंतर) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले आहे. तसेच विश्वचषकाच्या बाद फेरीत गेल्या सहा सामन्यांतील पोर्तुगालचा हा पहिला विजय ठरला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढती
शुक्रवार (९ डिसेंबर)
- क्रोएशिया वि. ब्राझील, रात्री ८.३० वाजता
- नेदरलँड्स वि. अर्जेटिना, मध्यरात्री १२.३० वाजता
शनिवार (१० डिसेंबर)
- मोरोक्को वि. पोर्तुगाल, रात्री ८.३० वाजता
- इंग्लंड वि. फ्रान्स, मध्यरात्री १२.३० वाजता