Best Bowling Figures in T20: टी२० क्रिकेटमध्ये आज नवा इतिहास रचला गेला आहे. मलेशियाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सियाजरुल इद्रासने ७ विकेट्स घेत अनोखा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो टी२० इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे. मलेशियाचा गोलंदाज सियाजरुल इद्रासने टी२० विश्वचषक आशिया ब क्वालिफायर सामन्यामध्ये चीनविरुद्ध ८ धावांत ७ विकेट्स घेतल्या. आज (२६ जुलै) क्वालालंपूरमध्ये हा सामना खेळला गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सियाजरुलच्या गोलंदाजीमुळे चीनचा संघ केवळ ११.२ षटकांत २३ धावांत गारद झाला. टी२० क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. सियाजरुलने पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ‘पीटर अहो’चा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मोडला. नायजेरियाकडून खेळताना पीटरने २०२१ मध्ये सिएरा लिओनविरुद्ध हा विक्रम केला होता. त्यानंतर पीटरने ५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

सियाजरुलच्या गोलंदाजीमुळे चीनचा संघाचा सुपडा साफ झाला. अवघ्या २३ धावांत खुर्दा झाला. टी२० क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. त्याचबरोबर टीम टीमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम ‘आयल ऑफ मॅन’ देशाच्या नावावर आहे. या वर्षी स्पेनविरुद्ध २०२३ मध्ये ती १० धावांवर बाद झाली होती. त्याचवेळी, तुर्कीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तो चेक रिपब्लिकविरुद्ध अवघ्या २१ धावांत बाद झाला.

सातही खेळाडूंना क्लीन बोल्ड केले

सियाजरुलच्या गोलंदाजीबद्दल जर बोलायचे झाले तर त्याच्या गोलंदाजीसमोर चीनचे फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली होती. त्याने त्याच्या गोलंदाजीत नवीन विक्रम करत सर्वच्या सर्व सातही खेळाडूंना त्रिफळाचीत म्हणजे क्लीन बोल्ड केले. सियाजरुलच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर चीनच्या फलंदाजांसमोर उत्तर नव्हते. सियाजरुलने आतापर्यंत २३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने एकूण ४७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: Ishant Sharma: “विराट कोहलीमुळे झहीर खानची कारकीर्द संपली”, इशांत शर्माच्या खुलाशाने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

पूर्ण सदस्य देशांतील खेळाडू दीपक चाहरच्या विक्रम मोडला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) पूर्ण सदस्य असलेल्या देशांमध्ये हा विक्रम भारताच्या दीपक चाहरच्या नावावर आहे. चाहरने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर युगांडाचा दिनेश नाक्राणी चाहरबरोबर संयुक्तपणे या पदावर आहे. दिनेशने २०२१ मध्ये युगांडाकडून लेसोथोविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्त्या.

अशातच सियाजरुल इद्राससमोर चीनचा डाव गडगडला

नाणेफेक जिंकल्यानंतर चीनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इद्रसने जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा चीनने चार षटकांत बिनबाद १२ धावा केल्या होत्या. इद्रासने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वांग लियुयांगला ३ धावांवर बाद केले. त्याच षटकात त्याने आणखी तीन विकेट्स घेतल्या आणि पुढच्या षटकात आपले पाच विकेट्स पूर्ण केल्या.

हेही वाचा: IND vs WI: वन डे मालिकेआधी टीम इंडियाने केली नवीन जर्सी लाँच; फोटोशूट दरम्यान रोहित-विराट गायब, पाहा Video

सियाजरुल इद्रासचे शेवटचे षटक हे एक मेडन आणि आणखी दोन विकेट्ससह या शानदार पद्धतीने संपले. अशा प्रकारे त्याच्या गोलंदाजाचे आकडेचा ४-१-८-७ सांगतात की, तो किती जबरदस्त गोलंदाजी स्पेल टाकत होता. त्याच्या स्पेलच्या नऊ षटकांच्या शेवटी, चीनची धावसंख्या ९ बाद २० होती. काही क्षणांनंतर, विजय उन्नीने लुओ शिलिनला एलबीडब्ल्यू बाद करून चीनला २३ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात मलेशियानेही आपले सलामीवीर झटपट गमावले आणि दोन षटकांनंतर त्यांची धावसंख्या २ बाद ३ अशी झाली. मात्र, विरनदीप सिंगने अवघ्या १४ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा करत आपल्या संघाला ४.५ षटकांत विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syazrul idrus history made by syazrul idrus indias deepak chahar broke the record of taking 7 wickets in t20 cricket avw