महिला टी २० मालिकेतील दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ४ गडी राखून पराभव झाला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली आहे. असं असलं तरी भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एलिसा तंबूचा रस्ता दाखवला. ती अवघ्या ४ या धावसंख्येवर तंबूत परतली.

शिखा पांडेने ऑफ साइडवरून इनस्विंग टाकताना एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. तिच्या या चेंडूला सोशल मीडियावर ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ आणि ‘बॉल ऑफ द इअर’ संबोधलं जात आहे. तिने टाकलेला चेंडू इतका स्विंग झाला की, बघणाऱ्यांचे डोळे चक्रावले. तसेच हिलीला आपण विकेट वाचवणं देखील कठीण झालं.

वसीम जाफरने ट्वीट करत या चेंडूला बॉल ऑफ द इअर संबोधले आहे. “महिला क्रिकेटमध्ये हा बॉल ऑफ द सेंच्युरी आहे. काय मस्त गोलंदाजी केली शिखा पांडे”, असं ट्वीट जाफरने केलं आहे.

भारतीय संघ- शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड

ऑस्ट्रेलिया संघ- एलिसा हीली, बेथ मूनी, मेन लेनिंग, एश गार्डनर, एलिस पेरी, ताहिला मॅक्ग्राथ, निकोला कॅरी, सोफी मॉलिनुक्स, जॉर्जिय वारहम, डार्लिनग्टन, टायला

Story img Loader