T 20 World Cup Team India: टी २० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मालिकेत आता सलामीवीर रोहितसह विराट मैदानात उतरणार अशा चर्चा रंगत होत्या. यावरून उत्तर देत अलीकडेच रोहित शर्माने के. एल राहुलच सलामीवीर असेल असे सांगितले होते. पण तरीही विराटचा सुधारलेला फॉर्म पाहता कदाचित शेवटच्या क्षणी रोहित विराटला संधी देईल अशीही चर्चा सुरु आहे. या सगळ्या चर्चांमध्ये भारतातील एका हिंदी वृत्त वाहिनीवर मात्र सलामीवीरासंबंधी भलतीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. बातमी देताना या निवेदकाने रोहित, राहुल, विराट सगळ्यांनाच बाजूला करून चक्क राहुल गांधीच सलामीला मैदानात उतरणार असल्याचे म्हंटले आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लाईव्ह टीव्हीवर बातम्या देताना कितीही तरबेज निवेदक असला तरी गोंधळ कधीही होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडिओमधील अँकरचा झाला. खरंतर रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून के. एल. राहुल येणार हे सांगताना चुकून राहुल गांधी सलामीला येणार असे हा निवेदक बोलून गेला.

ICC T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरला; रोहित शर्मा कर्णधार तर विराटला..

“भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की राहुल गांधी टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करतील. विराट कोहलीला काही सामन्यात संधी मिळेल” असे म्हणताना निवेदक इतका सहज बोलून गेला की कदाचित आपली चूक त्याच्या लक्षातही आली नसावी.

राहुल गांधी सलामीवीर

दरम्यान, रोहित शर्माने सांगितल्यानुसार, विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा व के. एल. राहुल सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात उतरतील तर आणि तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा बॅकअप पर्याय असेल. याशिवाय रोहितने स्पष्टपणे नमूद केले की कोहलीशिवाय इतर कोणाचाही बॅकअप पर्याय म्हणून विचार केलेला नाही.