T 20 World Cup Virat Kohli Viral Video: टी २० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये ४ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखत विजय मिळवला. मोहम्मद शमीच्या षटकात विराट कोहलीची जादू पाहायला मिळाली. विराटने खेळाच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली, जवळपास अशक्य वाटणारी ही विकेट घेऊन माजी कर्णधाराने सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. कोहलीने झेललेली ही कॅच सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. उपकर्णधार केएल राहुलने उत्तम सुरुवात करून संघाला १८७ धावांपर्यंत घेऊन जाण्यात मदत केली. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणदाण उडवली होती. १८७ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श व अ‍ॅरोन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांना चिंतेत टाकले होते. भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांनी एक एक करत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये धाडले मात्र तरीही सामना पूर्णपणे भारताच्या हातात आला नव्हता.

अगदी शेवटच्या षटकातही ऑस्ट्रेलियाला ३ चेंडूंमध्ये ७ च धावा हव्या होत्या. अशावेळी मोहम्मद शमीच्या चेंडूवर पॅट क्युमिन्सने षटकार लगवण्यासाठी बॅट फिरवली पण अगदी शेवटच्या क्षणी सीमारेषेजवळच विराट कोहलीने थक्क करणारा झेल घेतला. बाउंड्रीच्या अगदी काहीच अंतरावर विराटने घेतलेली कॅच पाहून मागे बसलेले ऑस्ट्रेलियन खेळाडूही थक्क झाले.

विराट कोहलीची जादू

दरम्यान शमीने विराटच्या या कॅचनंतर पुढील दोन चेंडूत जॉश इंग्लिस व केन रिचर्डसन यांचा त्रिफळा उडवून आपली हॅट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी परतल्याने या सराव सत्राची सुरुवात टीम इंडियासाठी गोड झाली आहे.

Story img Loader