अॅलेक्स हेल्सने पुन्हा एकदा आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टी-२० सामन्यामध्ये वेगवान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आपल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडच्या या सलामीला येणाऱ्या फंलादाजाने टी-२० ब्लास्ट मालिकेमध्ये डरहमच्या विरोधात केवळ ५४ चेंडूंमध्ये ९६ धावांची खेळी केली. या खेळीमुळे नॉर्टिंगहमशायरने १३ धावांनी हा सामना जिंकला. अॅलेक्स हेल्सने आपल्या खेळीदरम्यान १० चौकार आणि ४ षटकार लगावला. त्यांचा स्ट्राइक रेट १७७ हूनही अधिक होता. या खेळीसाठी अॅलेक्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
अॅलेक्सच्या खेळीच्या जोरावर नॉर्टिंगहमशायरने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना डरहमच्या संघाला २० षटकांमध्ये केवळ १८२ धावांपर्यंत मजल मारता आली. डरहमच्या डेव्हिड बेडींहमने ४२ चेंडूमध्ये ६५ तर ग्राहम चेकने १९ चेंडूत ३९ धावा केल्या. मात्र त्यांना सांघाला विजय मिळवून देता आला नाही.
नक्की पाहा >> Video : मैदानाच्या मध्य भागातून मारला गोल, ठरला Euro कपच्या इतिहासातील सर्वात खास गोल
अॅलेक्स हेल्सने टी-२० सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली असली तर समोर येणाऱ्या माहितीनुसार इंग्लंडच्या संघामध्ये त्याला पुन्हा स्थान मिळणे कठीण दिसत आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार सूत्रांनी अॅलेक्स हेल्स सध्या निवड समितीच्या विचाराधीनसुद्धा नाहीय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एड स्मिथला अॅलेक्स हेल्स संघात नकोय.
अॅलेक्स हेल्स इंग्लंडकडून ११ कसोटी सामने, ७० एकदिवसीय सामने आणि ६० टी-२० सामने खेळला आहे. सन २०१५ मध्ये इंग्लंडच्या संघाने अगदीच वाईट कामगिरी केल्यानंतर संघाला पुन्हा जम बसवण्यासाठी अॅलेक्स हेल्सने महत्वपूर्ण योगदान दिलं होतं. मात्र आता यापुढे अॅलेक्स हेल्स इंग्लंडच्या जर्सीमध्ये कधीच दिसणार नसल्याच्या बातम्या ब्रिटीश प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत.
अॅलेक्स हेल्सला सध्या इंग्लंडच्या संघाचे दरवाजे जवळजवळ बंद झाल्याचे चित्र दिसत असलं तरी टी-२० प्रकारामध्ये सर्वात प्रभावशाली खेळाडूंमध्ये त्याचे समावेश होतो. आपल्या ताकदीच्या जोरावर सामना फिरवण्याचं कौशल्य अॅलेक्स हेल्सकडे आहे. बिग बॅश लीगमध्ये खेळताना १५ सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक ५४३ धावा केल्या होत्या. अॅलेक्स हेल्सला आयपीएलच्या लिलावामध्येही कोणी बोली लावून विकत घेतलं नाही. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये अॅलेक्स हेल्सला संधी मिळण्याची चिन्हं मात्र सध्या दिसत आहेत.