टी २० स्पर्धेत भारतीय गोलंदाज दीपक चाहरच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. दीपक चाहरने २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळताना ७ धावा देत ६ गडी बाद केले होते. काही दिवसांपूर्वी युगांडाच्या दिनेश नाकरानीने या विक्रमाची बरोबरी केली होती. आता नायजिरियाचा गोलंदाज पीटर आहोने विक्रम मोडीत काढला आहे. पीटर आहोने सिएरा लिओन विरुद्ध खेळताना ५ धावा देत ६ गडी बाद केले आणि विक्रम आपल्या नावार केला. त्याचबरोबर आहोने हॅटट्रीकही घेतली. हॅटट्रीक घेणारा जगातला २२ वा गोलंदाज ठरला आहे.

नायजिरियाने १९ ते २६ ऑक्टोबर दरम्यान खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांच्या टी २० मालिकेत सिएरा लिऑनचा ५-१ असा पराभव केला. पहिला सामन्यात नायजिरियाचा सिएरा लिओन संघाने ६ गडी पराभव केला होता. मात्र त्यानंतरचे पाच सामने नायजिरियाने जिंकले. नायजिरियाने दुसरा सामना ६ धावांनी, तिसरा सामना ६९ धावांनी, चौथा सामना ९ गडी राखून, पाचवा सामना १९ धावांनी आणि सहावा सामना ३६ धावांनी जिंकला. सिएरा लिओन संघ टी २० आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा ८४ वा देश आहे.

सिएरा लिओनच्या जॉन बांगुराने टी २० मालिकेत सर्वाधिक १२० धावा केल्या. तर सिएरा लिओनच्या सॅम्युअल कोंटेहने सर्वाधिक १२ गडी बाद केले आहे. नायजिरियाच्या अस्मित श्रेष्ठने सर्वाधिक १०२ आणि सिल्व्हेस्टर ऑकपेने सर्वाधिक ११ गडी बाद केले आहेत.

Story img Loader