युवराज सिंगने एकूण ७ षटकार आणि ४ चौकारांसह ३६ चेंडुंमध्‍ये मोटेरावर झंझावाती ७२ धावांची खेळी केली. युवराज सिंगच्या धडाकेबाज खेळीच्‍या जोरावर भारताने पाकिस्‍तानसमोर १९३ धावांचे आव्‍हान ठेवले आहे. युवराजने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत ४४ चेंडुंमध्‍ये ९७ धावांची भागीदारी केली. धोनीने ३३ धावा केल्या. आज अनेक दिवसांनी युवराज‍ सिंगचा धमाका पुन्हा पाहायला मिळाला. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताची पाकिस्‍तानविरुद्ध ही सर्वोच्‍च धावसंख्‍या आहे. तसेच युवराज सिंगचीही ट्वेन्टी-२० मधील सर्वोच्‍च खेळी आहे.
गौतम गंभीर आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. गंभीर ११ चेंडुंमध्‍ये २१ धावा आणि अजिंक्य रहाणे २८ धावांवर बाद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा