दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकलेला भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आयपीएलसाठी तंदुरुस्त आणि सज्ज आहे. क्रिकेटमधील नवीन नियमांमुळे एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांसाठी सोपे असल्याचे मत इशांतने व्यक्त केले आहे.
‘‘मी पूर्णपणे तंदुरुस्त असून आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झालो आहे. माझ्या मते एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये गोलंदाजी करणे सोपे असते. एकदिवसीय क्रिकेटपेक्षा ट्वेन्टी-२०मध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ ठेवता येऊ शकतो. त्यामुळेच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांना भेदक मारा करणे अधिक सोपे जाते,’’ असे इशांत म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 is easier for pacers than odis ishant sharma