IND vs AUS, 5 T20I Matches Series: २०२३च्या विश्वचषकानंतरही भारताला विश्रांती मिळणार नाही. कारण, भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबरच्या शेवटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया भारतातच राहणार आहे. माहितीसाठी की, सध्या भारतीय संघ ICC T20 संघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारताला हा ताज कायम ठेवायचा आहे. यात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

या वर्षाशिवाय पुढचे वर्षही भारतीय क्रिकेट संघासाठी पूर्णपणे व्यस्त असणार आहे. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये होणार्‍या २०२३ एकदिवसीय विश्‍वचषकानंतर टीम इंडियाचे लक्ष टी२० आणि कसोटीवर असेल. खरे तर पुढील वर्षी २०२४ मध्ये टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतून अमेरिकेत होणाऱ्या भारताचे मिशन टी२० विश्वचषक असेल.

दरम्यान वर्ल्ड कपनंतर लगेचच टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. अहवालानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये खेळवली जाईल. त्यामुळे रोटेशन पॉलिसीनुसार संघात कोणाकोणाला संधी मिळते? तसेच, दिग्गज वरिष्ठ खेळाडूंबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

भारत २०२५ मध्ये ‘या’ संघांशी स्पर्धा करेल

विश्वचषकानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी२० मालिका नक्कीच खेळणार आहे. पण जानेवारी-फेब्रुवारी २०२५ मध्ये इंग्लंडला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात यावे लागेल. त्याचबरोबर भारत या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे.

हेही वाचा: Ashes 2023: MCCने तीन सदस्यांना केले निलंबित; लॉंग रूम घटनेवर उस्मान ख्वाजाची टीका, म्हणाला, “मी गप्प बसून ऐकून घेणार…”

WTC फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला

विशेष म्हणजे, नुकताच WTC फायनल २०२३ सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताविरुद्ध विजयाची नोंद करून प्रथमच WTC विजेतेपद पटकावले. तर भारताला दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

२०२३ एकदिवसीय विश्वचषकानंतर टीम इंडियाचे संभाव्य वेळापत्रक

डिसेंबरमध्ये – अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका

डिसेंबर-जानेवारी – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने

जानेवारी-फेब्रुवारी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची T20I मालिका

मार्च – घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका

जुलै – भारताचा श्रीलंका दौरा (३ वन डे आणि ३ टी२०)

सप्टेंबर-ऑक्टोबर – घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी२० सामने

ऑक्टोबर-नोव्हेंबर – न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन कसोटी.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप वेळापत्रकात झाला बदल, आता ‘या’ दिवशी होणार भारत वि. श्रीलंका मुकाबला; जाणून घ्या

टीम इंडियाचे वेळापत्रक यावर्षीही व्यस्त

यावर्षी आतापर्यंत टीम इंडिया पूर्ण अॅक्शनमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे शेड्यूल खूपच व्यस्त आहे. १२ जुलैपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. त्यानंतर आशिया कप आणि त्यानंतर आयर्लंडविरुद्धची मालिका. त्याच वेळी, २०२३ एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळला जाईल, ज्यामध्ये टीम इंडिया सर्वाधिक प्रवास करेल. वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया देशाच्या ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले सामने खेळणार आहे.

Story img Loader