Jan Nicol Loftie Eaton broke Kusal Malla’s record by scoring the fastest century : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आज सर्वात वेगवान शतकाची नोंद झाली आहे. नेपाळ टी-२० तिरंगी मालिकेत नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी ईटनने नेपाळविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. गेल्या वर्षी मंगोलियाविरुद्ध आशियाई क्रीडा स्पर्धेत ३४ चेंडूत शतक झळकावणारा नेपाळचा क्रिकेटपटू कुसल मल्लाचा विक्रम त्याने मोडला.

जॅन निकोल लॉफ्टी ईटनने ३६ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे नामिबियाने २० षटकांत ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० पेक्षा कमी चेंडूत शतक झळकावणारा जॅन निकोल लॉफ्टी इटन हा सातवा फलंदाज ठरला. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावून कुशल मल्लाने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेव्हिड मिलर, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेक प्रजासत्ताकचा सुदेश विक्रमसेकेरा यांचा विक्रम मोडीत काढला होता. ज्यांनी ३५-३५ चेंडूत शतकं ठोकली होती.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Jos Buttler hit 115 meter longest six out of stadium
Jos Buttler : जोस बटलरने मारला वर्षातील सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने गोलंदाजासह चाहतेही अवाक्, VIDEO व्हायरल

जॅन निकोल लॉफ्टी ईटनने १८ चेंडूत झळकावले अर्धशतक –

जॅन निकोल लॉफ्टी ईटनने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील ५० धावा करण्यासाठी फक्त १५ चेंडू लागले. २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. अविनाश बोहराच्या चेंडूवर गुलसन झाने त्याचा झेल घेतला. तो ११ व्या षटकात जेव्हा फलंदाजीला आला होता, तेव्हा नामिबियाची धावसंख्या ३ विकेट्स ६२ धावा अशी होती. यानंतर जॅन निकोल लॉफ्टी ईटनने या डावात २८०.५६ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने मलान क्रुगरच्या साथीने त्याने चौथ्या विकेटसाठी ५२ चेंडूत १३५ धावा जोडून नामिबियाची धावसंख्या ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवली.

हेही वाचा – Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय

नामिबियाने २० धावांनी सामना जिंकला –

सलामीवीर क्रुगर ४८ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला, तर ३३ चेंडूत शतक झळकावणाऱ्या जॅनला बोहराने बाद केले. दुसरीकडे, लॅफी-ईटनने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आणि तीन षटकांत २९ धावांत २ बळी घेतले. ज्यामुळे प्रत्युतरात नेपाळचा डाव १९ व्या षटकात १८६ धावांवर संपुष्टात आला. अशा प्रकारे नामिबियाने २० धावांनी सामना जिंकला.