टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्थळ तपासणी पथकाने ऑकलंड, फ्लोरिडा आणि लॉस एंजेलिससारख्या काही शहरांना भेट दिली. वास्तविक, पुढच्या वर्षीचा टी-२० विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संयुक्तपणे आयोजित करणार आहे. अमेरिका क्रिकेटचे अध्यक्ष अतुल राय यांनी ही माहिती दिली. यासोबतच टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वेस्ट इंडिजऐवजी अमेरिकेत होऊ शकतो, अशी माहितीही देण्यात आली.
भारत विरुद्ध पाकिस्तान या आयसीसी स्पर्धेतील सर्वात मोठा ‘बॉक्स ऑफिस’ सामना दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचा विचार करता वेस्ट इंडिजमध्ये न होता अमेरिकेत होण्याची शक्यता आहे. राय यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या सामन्याला मिळालेला प्रतिसाद पाहता, तो अमेरिकेत होईल.” भारताच्या या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती.
अमेरिकेतील २०२४ ची जागतिक स्पर्धा ही अशा प्रकारची पहिलीच स्पर्धा असेल, तर कॅरिबियनने यापूर्वीच एकदिवसीय(२००७) आणि टी-२० विश्वचषक आयोजित केला आहे. अतुल राय म्हणाले, “ख्रिस टेटली यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी स्पर्धेच्या संघाने मे महिन्यात दौरा केला, ज्यामध्ये त्यांनी विविध शहरांतील अनेक मैदानांना भेट दिली होती. ते काही आठवड्यांपूर्वी (डिसेंबर) पुन्हा आले आणि साइटला भेट दिली.
हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: शुबमन गिलने रोहित-इशानचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील आठवा फलंदाज
युनायटेड स्टेट्समधील बहुतेक स्टेडियम बेसबॉलसाठी बांधली गेली आहेत, जे आकाराने लहान आहेत आणि त्यांची आसन क्षमता जास्त आहे. तथापि, अतुल राय यांनी अशा सर्व चिंता दूर करण्यासाठी देशातील मागील क्रिकेटच्या घटनांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले, “आपण लॉस एंजेलिसच्या मैदानावर नजर टाकली, तर भारत अ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने खेळण्यासाठी आला होता. मोठ्या सीमारेषेसह हे एक योग्य क्रिकेट मैदान आहे आणि प्रेक्षक आसन क्षमता देखील खूप चांगली आहे.”
अतुल राय यांनी देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरात, न्यूयॉर्कमध्येही सामना आयोजित करण्याच्या शक्यतेबद्दल सांगितले. तसेच आशियाई उपखंडातील टाइम झोनमधील फरक लक्षात घेऊन सामन्याच्या संभाव्य वेळेवर आपले मत मांडले.
हेही वाचा – SAT20: विल जॅकने सीमारेषेवर पकडला आश्चर्यकारक झेल; पाहून स्टीफन फ्लेमिंगदेखील झाला थक्क; पाहा VIDEO
अतुल राय म्हणाला, “न्यूयॉर्कमध्येही एक शक्यता आहे. कारण तिथे या खेळाला पसंती देणारी मोठी लोकसंख्या आहे. दोन दशकांपूर्वी, एनव्हायसीच्या तत्कालीन महापौरांनी दावा केला होता की,की प्रत्येक आठ न्यूयॉर्कमधील एक क्रिकेटशी जोडला आहे.न्यूयॉर्क शहरातील कोणत्याही मैदानात आयोजित केले जाणारे तात्पुरते स्टँड जास्तीत जास्त दोन आठवड्यांत बांधले जातील. न्यूयॉर्कमधील सर्व मैदानांवर टर्फ पिच आहेत.”