टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंड २ गडी गमवून १९ षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे.

न्यूझीलंडचा डाव

अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.

अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद जोडी सलामीला मैदानात उतरली. मात्र सलामीची जोडी काही खास करु शकली नाही. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. मोहम्मद शहजाद ११ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. . रहमनुल्लाह गुरबाज (६), गुलबदीन नइब १५ धावा करून माघारी पतरले. मात्र नजीबुल्लाह झाद्रनने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात झटपट गडी बाद झाल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद नबी (१४), करिम जनत (२), राशीद खान (३) अशा धावा करत तंबूत परतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

न्यूझीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, एडम मिलने, टीम साउथी, इश सोढी, ट्रेन्ट बोल्ट

अफगाणिस्तानचा संघ- हझ्रतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह झाद्रन, मोहम्मन नबी, गुलबदीन नइब, करिम जनत, राशीद खान, नवीन उल हक, हमिद हसन, मुजीब उर रहमान

Live Updates
18:32 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडचा डाव

अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.

18:27 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १७ षटकात २ बाद ११८ धावा

केन विलियमसन नाबाद ३६ आणि डेवॉन कॉनवे नाबाद ३४ धावा

18:23 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १६ षटकात २ बाद १०८ धावा

केन विलियमसन नाबाद ३५ आणि डेवॉन कॉनवे नाबाद २६ धावा

18:18 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १५ षटकात २ बाद १०१ धावा

केन विलियमसन नाबाद २९ आणि डेवॉन कॉनवे नाबाद २६ धावा

18:15 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १४ षटकात २ बाद ९१ धावा

केन विलियमसन नाबाद २७ आणि डेवॉन कॉनवे नाबाद १८ धावा

18:10 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १३ षटकात २ बाद ७८ धावा

केन विलियमसन नाबाद २६ आणि कॉनवे नाबाद ६

18:06 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १२ षटकात २ बाद ७० धावा

केन विलियमसन नाबाद २० आणि कॉनवे नाबाद ४

18:01 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ११ षटकात २ बाद ६३ धावा

केन विलियमसन नाबाद १४ आणि कॉनवे नाबाद ३

17:54 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १० षटकात २ बाद ६१ धावा

केन विलियमसन नाबाद १३ आणि कॉनवे नाबाद २

17:51 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ९ षटकात २ बाद ५८ धावा

केन विलियमसन नाबाद ११ आणि कॉनवे नाबाद १

17:50 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडला दुसरा धक्का

मार्टिन गुप्टील राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मार्टिनने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे.

17:45 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ८ षटकात १ बाद ५३ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद २७ आणि केन विलियमसन नाबाद ९

17:42 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ७ षटकात १ बाद ५० धावा

मार्टिन गुप्टील नाबाद २६ आणि केन विलियमसन नाबाद ७

17:38 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ६ षटकात १ बाद ४५ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद २४ आणि केन विलियमसन नाबाद ४

17:36 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ५ षटकात १ बाद ३६ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद १६ आणि केन विलियमसन नाबाद ३

17:31 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ४ षटकात १ बाद ३० धावा

मार्टिन गुप्टील नाबाद ११ आणि केन विलियमसन नाबाद २

17:29 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडला पहिला धक्का

डेरिल मिशेल १७ धावा करून बाद झाला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला.

https://twitter.com/T20WorldCup/status/1457316780414619650

17:27 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या ३ षटकात बिनबाद २६ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद ९ आणि डेरिल मिशेल नाबाद १७

17:22 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या २ षटकात बिनबाद १५ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद ४ आणि डेरिल मिशेल नाबाद ११

17:19 (IST) 7 Nov 2021
न्यूझीलंडच्या १ षटकात बिनबाद ७ धावा

मार्टिन गुप्टील नाबाद ३ आणि डेरिल मिशेल नाबाद ४

17:15 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानचं ८ गडी गमवून विजयासाठी १२५ धावांचं

अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या.

https://twitter.com/T20WorldCup/status/1457311165906751495

17:13 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद जोडी सलामीला मैदानात उतरली. मात्र सलामीची जोडी काही खास करु शकली नाही. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. मोहम्मद शहजाद ११ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. . रहमनुल्लाह गुरबाज (६), गुलबदीन नइब १५ धावा करून माघारी पतरले. मात्र नजीबुल्लाह झाद्रनने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात झटपट गडी बाद झाल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद नबी (१४), करिम जनत (२), राशीद खान (३) अशा धावा करत तंबूत परतले.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1457312242177818626

17:00 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानच्या १९ षटकात ७ बाद १२२ धावा

अफगाणिस्तानने १९ व्या षटकात दोन गडी गमवले. मोहम्मद नबीनंतर लगेचच नझीबुल्लाह झाद्रन बाद झाला. त्याने ४८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. लगेच करिम जनतही २ धावा करून तंबूत परतला

16:58 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानला सहावा धक्का

मोहम्मद नबीनंतर लगेचच नझीबुल्लाह झाद्रन बाद झाला. त्याने ४८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर नीशमने त्याचा झेल घेतला.

16:56 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानला पाचवा धक्का

मोहम्मद नबी २० चेंडूत १४धावा करून बाद झाला. टीम साऊथीने बाद केले.

16:54 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानच्या १८ षटकात ५ बाद ११५ धावा

नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ६९ धावा

16:48 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानच्या १७ षटकात ४ बाद १०१ धावा

नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५७ आणि मोहम्मद नबी नाबाद १३ धावा

16:44 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानच्या १६ षटकात ४ बाद ९६ धावा

नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५४ आणि मोहम्मद नबी नाबाद ११ धावा

16:40 (IST) 7 Nov 2021
नजीबुल्लाह झाद्रनची अर्धशतकी खेळी

नजीबुल्लाहने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

https://twitter.com/T20WorldCup/status/1457303998562664448

16:39 (IST) 7 Nov 2021
अफगाणिस्तानच्या १५ षटकात ४ बाद ९१ धावा

नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५० आणि मोहम्मद नबी नाबाद १० धावा