टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंड २ गडी गमवून १९ षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
न्यूझीलंडचा डाव
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.
New Zealand are into the semis ?#T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/paShoZpj88 pic.twitter.com/PRo6Ulw4Dk
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
अफगाणिस्तानचा डाव
अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद जोडी सलामीला मैदानात उतरली. मात्र सलामीची जोडी काही खास करु शकली नाही. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. मोहम्मद शहजाद ११ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. . रहमनुल्लाह गुरबाज (६), गुलबदीन नइब १५ धावा करून माघारी पतरले. मात्र नजीबुल्लाह झाद्रनने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात झटपट गडी बाद झाल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद नबी (१४), करिम जनत (२), राशीद खान (३) अशा धावा करत तंबूत परतले.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
न्यूझीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, एडम मिलने, टीम साउथी, इश सोढी, ट्रेन्ट बोल्ट
अफगाणिस्तानचा संघ- हझ्रतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह झाद्रन, मोहम्मन नबी, गुलबदीन नइब, करिम जनत, राशीद खान, नवीन उल हक, हमिद हसन, मुजीब उर रहमान
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.
केन विलियमसन नाबाद ३६ आणि डेवॉन कॉनवे नाबाद ३४ धावा
केन विलियमसन नाबाद ३५ आणि डेवॉन कॉनवे नाबाद २६ धावा
केन विलियमसन नाबाद २९ आणि डेवॉन कॉनवे नाबाद २६ धावा
केन विलियमसन नाबाद २७ आणि डेवॉन कॉनवे नाबाद १८ धावा
केन विलियमसन नाबाद २६ आणि कॉनवे नाबाद ६
केन विलियमसन नाबाद २० आणि कॉनवे नाबाद ४
केन विलियमसन नाबाद १४ आणि कॉनवे नाबाद ३
केन विलियमसन नाबाद १३ आणि कॉनवे नाबाद २
केन विलियमसन नाबाद ११ आणि कॉनवे नाबाद १
मार्टिन गुप्टील राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मार्टिनने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे.
मार्टिन गुप्टील नाबाद २७ आणि केन विलियमसन नाबाद ९
मार्टिन गुप्टील नाबाद २६ आणि केन विलियमसन नाबाद ७
मार्टिन गुप्टील नाबाद २४ आणि केन विलियमसन नाबाद ४
मार्टिन गुप्टील नाबाद १६ आणि केन विलियमसन नाबाद ३
मार्टिन गुप्टील नाबाद ११ आणि केन विलियमसन नाबाद २
डेरिल मिशेल १७ धावा करून बाद झाला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला.
मार्टिन गुप्टील नाबाद ९ आणि डेरिल मिशेल नाबाद १७
मार्टिन गुप्टील नाबाद ४ आणि डेरिल मिशेल नाबाद ११
मार्टिन गुप्टील नाबाद ३ आणि डेरिल मिशेल नाबाद ४
अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या.
अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद जोडी सलामीला मैदानात उतरली. मात्र सलामीची जोडी काही खास करु शकली नाही. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. मोहम्मद शहजाद ११ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. . रहमनुल्लाह गुरबाज (६), गुलबदीन नइब १५ धावा करून माघारी पतरले. मात्र नजीबुल्लाह झाद्रनने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात झटपट गडी बाद झाल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद नबी (१४), करिम जनत (२), राशीद खान (३) अशा धावा करत तंबूत परतले.
अफगाणिस्तानने १९ व्या षटकात दोन गडी गमवले. मोहम्मद नबीनंतर लगेचच नझीबुल्लाह झाद्रन बाद झाला. त्याने ४८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. लगेच करिम जनतही २ धावा करून तंबूत परतला
मोहम्मद नबीनंतर लगेचच नझीबुल्लाह झाद्रन बाद झाला. त्याने ४८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर नीशमने त्याचा झेल घेतला.
मोहम्मद नबी २० चेंडूत १४धावा करून बाद झाला. टीम साऊथीने बाद केले.
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ६९ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५७ आणि मोहम्मद नबी नाबाद १३ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५४ आणि मोहम्मद नबी नाबाद ११ धावा
नजीबुल्लाहने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५० आणि मोहम्मद नबी नाबाद १० धावा