टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. सलग चार सामने जिंकत इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपसाठी इंग्लंडला प्रमुख दावेदार मानलं जातं आहे. मात्र असं असलं इंग्लंडची विजयी घोडदौड फक्त दोनच संघ रोखू शकतात असं माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने सांगितलं आहे. या दोन संघात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं नाव आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगला फॉर्मात आहे. मात्र अफगाणिस्तानचं नाव या शर्यतीत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ इंग्लंडला मात देऊ शकतो. पण हा सामना शारजाह मैदानात खेळला गेला तरच…अन्यथा कोणत्याही मैदानावर सामना खेळवल्यास इंग्लंड संघाला सामन्याआधीच चषक सोपवला पाहीजे.”, असं ट्वीट केविन पीटरसननं केलं आहे. इंग्लंडचा सुपर १२ फेरीतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत ६ नोव्हेंबरला आहे.

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. जोस बटलरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १० गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावाच करू शकला. बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचाही पराभव केला होता. त्याचबरोबर इंग्लंड संघाने २०१० मध्ये विजेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc england team can be beat by pak and afg say peterson rmt