दुबईच्या मैदानावर आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान एक जिद्दीची साक्ष देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉन्वे हात तुटल्यामुळे अंतिम फेरीतून बाहेर गेला. पण तो संघासाठी विश्वचषक जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कॉन्वेच्या हाताला जबर मार बसला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर कॉन्वेने बॅटवर हात जोरात मारला. त्यामुळे त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी सामन्यानंतर झाली. आता तो अंतिम सामना खेळणार नाही. याचा त्याला पश्चाताप होईल, पण तो संघाला मदतीचा हात पुढे करत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला कॉन्वे सहकारी खेळाडूंना प्रशिक्षण देताना दिसला. त्याने सराव सत्रात भाग घेतला आणि त्याने बदली खेळाडू टीम सेफर्टचा एका हाताने क्षेत्ररक्षणाचा सराव करून घेतला. न्यूझीलंड क्रिकेटनेही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – T20 WC FINAL : गंभीरची बातच न्यारी..! म्हणाला, “न्यूझीलंडनं ‘या’ कारणासाठी जिंकावा वर्ल्डकप!”

या व्हिडिओमध्ये तो टीम सेफर्ट सराव करताना दिसत आहे. कॉन्वेच्या दुखापतीनंतर यष्टीरक्षक फलंदाज सेफर्टला खेळण्याची संधी मिळेल. व्हिडिओमध्ये कॉन्वेचा उजवा हात प्लास्टर केलेला आहे. वृत्तानुसार, किवी संघाने सामन्यापूर्वी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रही आयोजित केले होते.

कॉन्वेला केवळ टी-२० विश्वचषक नव्हे, तर या महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतूनही वगळण्यात आले. कॉन्वेने उपांत्य फेरीत ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या विश्वचषकात सहा सामन्यांत त्याने १२९ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार फलंदाजी केली.

Story img Loader