टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. सुपर १२ फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आल्याने क्रीडाप्रेमींमध्ये निराशाजनक वातावरण आहे. वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या हवी तशी कामगिरी झाली नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पंड्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे भारताला एका गोलंदाजाची उणीव भासली होती. वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच दुप्पट मेहनत करत पुढच्या वर्षी होणाऱ्या टी २० वर्ल्डकपमध्ये पुनरागमन करू, असं सांगितलं आहे.

“आम्हाला वाटलं नव्हतं की, आमचं वर्ल्डकपमधील आव्हान असं संपुष्टात येईल. आम्ही कमी पडलो, पण चाहत्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्यासाठी दुप्पट मेहनत करू. सर्व लोकांचं धन्यवाद ज्यांनी स्टेडियम आणि घरून आमचं समर्थन केलं.”, असं ट्वीट हार्दिक पंड्याने केलं आहे.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने नामिबियाला हरवत आपली मोहिम संपवली. भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली नसली, तरी शेवटच्या तीन सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवत आपल्या शक्तीची साक्ष दिली. उशिराने का होईना, परंतु भारतासा सूर गवसला. बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर गेल्यामुळे उर्वरित संघांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीने टी-२० कप्तानपदही सोडले. आता तो फक्त खेळाडू म्हणून टी-२० संघात आपले योगदान देईल.

जय हिंद..! भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटची शेवटची पोस्ट; म्हणाला, “पुन्हा एकदा…”

भारताची नामिबियावर मात..
टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला ९ गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींचा हा शेवटचा सामना होता. दुबईच्या मैदानावर विराटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकात नामिबियाला ८ बाद १३२ धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेत नामिबियाला तंगवले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकत भारताचा विजय सुकर केला. रोहित आक्रमक अर्धशतक ठोकून माघारी परतला. त्यानंतर राहुल-सूर्यकुमारने विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader