पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभूत करत विजयारंभ केला आहे. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानने भारतानं दिलेलं आव्हान १० गडी राखून पूर्ण केलं. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आम्ही आमची योजना योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाहीत. आमच्या सलामीचे गडी झटपट बाद झाले. त्यामुळे सामन्यात पुनरागमन करणं कठीण असतं. मैदानातील दव पाहता कठीण होतं. पाकिस्तानने दर्जेदार गोलंदाजी केली. आमचा संघ पॅनिक होणारा नक्कीच नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे शेवट नाही”, असं कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितलं.

भारताचा डाव

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या. या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.