टी-२० विश्वचषकात प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. आता शमीच्या समर्थनार्थ अनेक लोकही समोर आले आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी, माजी क्रिकेटपटू वीरेद्र सेहवाग, इरफान पठाण शमीच्या बचावात उतरले आहे. कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर शमीला लक्ष्य केले जात आहे. यातून मुस्लिमांविरुद्धचा द्वेष दिसून येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघात ११ खेळाडू आहेत, पण लोक मुस्लिम खेळाडूला टार्गेट करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्वीट केले, “मोहम्मद शमीला ऑनलाइन लक्ष्य करणे धक्कादायक आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी इंडिया कॅप घालतो, त्याच्या हृदयात कोणत्याही ऑनलाइन उपद्रवीपेक्षा जास्त भारत असतो. मी तुझ्यासोबत आहे शमी. पुढील सामन्यात दाखवून दे.”

हेही वाचा – IND vs PAK : ‘‘जिजाजी…जिजाजी”, भारतीय प्रेक्षकांनी शोएब मलिकला मैदानातच दाखवलं प्रेम; सानियानं दिलं ‘असं’ उत्तर!

इरफान पठाण म्हणाला, “मी सुद्धा भारत-पाकिस्तानच्या मैदानावरच्या लढाईचा एक भाग होतो जिथे आम्ही हरलो होतो, पण मला कधीही पाकिस्तानला जाण्यास सांगितले गेले नाही! मी काही वर्षांपूर्वीच्या भारताच्या ध्वजाबद्दल बोलत आहे. हा मूर्खपणा थांबला पाहिजे.”

हरभजन सिंगने ट्विटरवर लिहिले, “आम्ही तुझ्यावर मोहम्मद शमीवर प्रेम करतो.”

काँग्रेसच्या राहुल गांधींनीही शमीला पाठिंबा दिला. ”मोहम्मद शमी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा करा”, असे राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

मोहम्मद शमी हा अलीकडच्या काळात भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने गेल्या पाच वर्षात चांगली कामगिरी केली आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या कामगिरीला धर्माशी जोडले. शमीने पाकिस्तानविरुद्ध ३.५ षटकात ४३ धावा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc ind vs pak sehwag and irfan pathan slams who abuses pacer mohammed shami adn