टी २० वर्ल्डकपच्या भारत पाकिस्तान सामन्यावर क्रीडाप्रेमींची बारीक नजर असते. प्रत्येक चुकांवर त्यांच्या प्रतिक्रिया उमटत असतात. वर्ल्डकपमधल्या बारिकसारिक चुकांमुळे सामन्यांचं गणित बदलतं. अशातच केएल राहुल शाहिन आफ्रिदीच्या नो बॉलवर बाद झाल्याने क्रीडाप्रेमींनी पंचांना धारेवर धरलं आहे. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर आधीच दडपण आलं होतं. मात्र त्यानंतर पंचांच्या चुकीमुळे केएल राहुलला बाद होत तंबूत परतावं लागलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित शर्मा शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केएल राहुलचा त्रिफळा उडाला. मात्र हा चेंडू नो बॉल होता. मात्र पंचाच्या नजरेतून सुटला आणि केएल राहुल बाद झाला. केएल राहुल ८ चेंडूत ३ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादवलाही खराब पंचगिरीचा फटका बसला. हसन अलीने सहाव्या षटकातला तिसरा चेंडू नो बॉल टाकला होता. मात्र पंचांनी तो चेंडू नो बॉल दिला नाही. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरच सुर्यकुमार यादव बाद झाला. भारताचे तीन गडी झटपट बाद झाल्याने धावगतीवर परिणाम झाला.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी .

पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

Story img Loader