शुक्रवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पाकिस्तानकडून ५ विकेट्सने पराभव झाला. एकावेळी सामन्यात अफगाणिस्तान वरचढ ठरेल, असे वाटत होते. पण पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात ४ षटकार ठोकून सामना फिरवला. या सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराचे नबीने तोंड बंद केले.
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने आपल्या देशाच्या पाकिस्तानशी असलेल्या राजकीय संबंधांबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नबीने त्या पत्रकाराशी बोलती बंद केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकाराची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि हेतू यावर लोक शंका घेत आहेत. पत्रकाराने नबीने विचारले, ”अफगाणिस्तानचा चांगला संघ खेळत आहे. खूप छान खेळतोय. दोन्ही सामन्यांमध्ये आपल्या संघाची कामगिरी चांगली झाली आहे. तुमच्या पाठीमागे असलेले सरकार घरी परतल्यावर तुमची चौकशी करणार आहे, अशी कुठेतरी तुम्हाला अशी भीती आहे का?” वास्तविक अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडे या पत्रकाराने बोट दाखवले.
यानंतर पत्रकार पुढे म्हणाला, ”माझा दुसरा प्रश्न आहे’, की हे नवीन युग सुरू झाले आहे. यामध्ये अफगाणिस्तानचे पाकिस्तानशी संबंध चांगले आहेत, त्यामुळे हे संबंध सुधारले तर अफगाणिस्तान संघ मजबूत होईल का?” या दोन प्रश्नांवर नबीने स्पष्टपणे उत्तरे दिली. तो म्हणाला, ”आपण परिस्थितीसोडून क्रिकेटबद्दल बोलू शकतो का?” यावर पत्रकार पुन्हा म्हणाला, ”मी फक्त क्रिकेटवरच प्रश्न विचारतो.” यावर नबी म्हणाला, ”आम्ही येथे विश्वचषक खेळण्यासाठी आलो आहोत. आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत. पूर्ण आत्मविश्वासाने इथे आलो. तुम्हाला क्रिकेटशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.”
हेही वाचा – T20 WC : ‘लॉर्ड ठाकूर’ खेळणार न्यूझीलंडविरुद्धचा सामना? विराट म्हणतो, ‘‘शार्दुल आमच्या…”
नबीने वारंवार नकार देऊनही, पत्रकार त्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत राहिला. दोघांमधील वाढती भांडणे पाहून पत्रकार परिषद हाताळणाऱ्या आयसीसी अधिकाऱ्याने पत्रकाराला दुसरा प्रश्न विचारण्यास सांगितले. पण पत्रकाराला ते मान्य नव्हते. यानंतर नबी पत्रकार परिषद सोडून निघून गेला.