टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. १७ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) बनवण्यात आले. २४ ऑक्टोबरला पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानशी लढेल. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी धोनीने मार्गदर्शक होण्यासाठी किती मानधन घेतले याबाबत प्रतिक्रिया दिली.

शाह म्हणाले, ”धोनीने वर्ल्डकपसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतले नाहीत.” भारताने २००७ मध्ये फक्त टी-२० विश्वचषक जिंकला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. टी-२०चा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा आहे. त्याने आयपीएलमधून आरसीबीचे कर्णधारपदही सोडले आहे.

हेही वाचा – T20 World Cup : चाहत्यांसाठी निराशादायक बातमी; भारताचा ‘या’ संघाशी होणारा सामना झाला रद्द!

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
  • राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.
  • मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी

भारताचे टी-२० विश्वचषकातील सामने

  • २४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • ३१ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
  • ३ नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
  • ५ नोव्हेंबर: भारत विरुद्ध B1
  • ८ नोव्हेंबर: भारत विरुद्ध A2

Story img Loader