न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन टी २० वर्ल्डकपमध्ये काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावं लागणार आहे. इंग्लंड विरूद्धच्या सराव सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. इंग्लंडने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात विल्यमसन खेळला नव्हता. सराव सामन्यानंतर विल्यमसनच्या कोपराच्या दुखापतीत वाढ झाली आहे, असं मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, केन विल्यमसननं आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादच्या शेवटच्या लीग सामन्यातही सहभाग घेतला नव्हता.
केन विल्यसमसनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाची चिंता वाढली आहे. विल्यमसन न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आहे. त्याच्यात सामना जिंकवण्याची क्षमता आहे. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत एकही वर्ल्डकप चषक जिंकलेला नाही. यावेळेस हे स्वप्न पूर्ण करण्याचा न्यूझीलंडचा मानस आहे. त्यामुळे विल्यमसन संघाणं असणं गरजेचं आहे.
न्यूझीलंडचे सामने
२६ ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिसान
३१ ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूझीलंड
३ नोव्हेंबर- न्यूझीलंड विरूद्ध बी १ क्वालिफायर
५ नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध ए २ क्वालिफायर
७ नोव्हेंबर- न्यूझीलंड विरूद्ध आफगाणिस्तान
न्यूझीलंड
केन विल्यमसन (कप्तान), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅमपॅन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल , काइल जेमिसन, डॅरेल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोढ़ी, टिम साउदी, एडम मिल्ने.