टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडा गमवून १७६ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमानने चांगली फलंदाजी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. असं असताना या सामन्यात एक प्रसंग असा आला की, पंचाचा जीव काही सेंकदासाठी वाचला. फकर झमानने १७ व्या षटकातला चौथा चेंडू सरळ मारला. हा चेंडू इतक्या वेगाने मारला की पंचाची नजर चुकली असती तर, चेंडू तोंडावर आदळला असता. पंच ख्रिस गॅफनी यांनी वेळेत जमिनीवर झोपले आणि संकट टळलं. अवघ्या ०.६८ सेंकदात पंच ख्रिस गॅफनी जमिनीवर आडवे झाले. या चेंडूवर फकरला चौकार मिळाला.

सोशल मीडियावर या क्षणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नेटकरी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत थोडक्यात वाचल्याच्या कमेंट्स देत आहेत.

vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News
Crime News : ‘टॉयलेट सीट चाटायला भाग पाडलं…’, १५ वर्षीय विद्यार्थ्याची रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; आईचा न्यायासाठी आक्रोश
pune survey conducted of city dilapidated unused dilapidated public toilets
पिंपरी : वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडणार
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
dombivli municipal corporation loksatta news
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेच्या स्वच्छता दुतांच्या उपद्रवाने नागरिक हैराण
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

T20 WC : गजबच..! पाकिस्तानच्या गोलंदाजानं टाकला दोन टप्पा चेंडू; स्ट्राईकवर असलेल्या वॉर्नरनं दिली ‘अशी’ शिक्षा; पाहा VIDEO

पाकिस्तानचा डाव
कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखत पाकिस्तानला उत्तम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी सातव्या षटकात पाकिस्तानने अर्धशतक फलकावर लावले. बाबरने आक्रमक तर रिझवानने संयमी पवित्रा धारण करत धावफलक हलता ठेवला. १०व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाने बाबरला झेलबाद केले. बाबरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बाबर-रिझवान यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावा केल्या. बाबरनंतर फखर झमान मैदानात आला. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात नसलेल्या जमानला आज सूर गवसला. त्याने रिझवानसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. १४व्या षटकात ऱिझवानने संघाचे शतक आणि आपले अर्धशतर फलकावर लावले. रिझवानचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठकले. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा रिझवान पहिला क्रिकेटपटू ठरला. १८व्या षटकात रिझवान स्टार्कचा बळी ठरला. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने आसिफ अली आणि शोएब मलिकला स्वस्तात गमावले. शेवटच्या षटकात जमानने स्टार्कला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. या षटकात पाकिस्तानने १५ धावा वसूल केल्या. २० षटकात पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा केल्या. जमानने ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या.

Story img Loader