दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱया सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे सुसाट फॉर्मात खेळणारा पाकिस्तान संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. या सामन्यात पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने शानदार सुरुवात करत रिझवानसोबत ७१ धावांची भागीदारी रचली. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये जलद २५०० धावांचा विक्रम नोंदवला. हा विक्रम सोशल मीडियावर सांगण्याच्या घाईत पाकिस्तान क्रिकेटने गंभीर चूक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाबरने टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान २५०० धावा करण्याचा विक्रम करत विराट कोहलीला मागे टाकले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३२ धावा करताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे. बाबरने ६२ सामन्यात तर विराटने ६८ सामन्यात २५०० धावा केल्या होत्या. पण पाकिस्तान क्रिकेटने आपल्या ट्विटर विराट ऐवजी सौरव गांगुली, सुनील गावसकर, विजय हजारे यांची नावे टाकली.

या गोंधळानंतर पाकिस्तान क्रिकेटने आपले ट्वीट काढून टाकले. पण नेटकऱ्यांनी स्क्रीनशॉट घेत पाकिस्तानला ट्रोल केले.

हेही वाचा – T20 WC: “क्रिकेटच्या मैदानात मला अशाच….”; पंतप्रधान इम्रान खान यांनी केली पाकिस्तान संघाची पाठराखण

असा रंगला सामना…

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.