टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्मात आहे. बाबर एक एक करत अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बाबरने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या खेळीत ५ चौकारांचा समावेश आहे. टी २० मध्ये वेगाने २५०० धावा करण्याचा विक्रम करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३२ धावा करताच त्याने हा विक्रम नोंदवला आहे. बाबर आझमने ६२ सामन्यात वेगाने २५०० धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने ६८ सामन्यात २५०० धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, पदार्पणाच्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबरने टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत ३०३ धावा केल्या आहेत. बाबरच्या आधी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या नावावर होता. हेडनने २००७ मध्ये २६५ धावा केल्या होत्या. हेडन सध्या पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार आहेत.
टी २० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही बाबर आझमच्या नावावर झाला आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला मागे टाकत हा विक्रम केला आहे. बाबर आझमने ६ सामन्यात एकूण ३०३ धाव केल्या आहेत. तर जोस बटरलच्या २६९ धावा आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
ऑस्ट्रेलिया – आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.