टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ चांगलाच फॉर्मात आहे. बाबर आझमची खेळी कर्णधारपदाला साजेशी आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने चौथी अर्धशतकी खेळी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बाबर ९ धावा करून बाद झाला होता. मात्र भारत, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. भारताविरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत नाबाद ६८ धावा, अफगाणिस्तान विरूद्ध ४७ चेंडूत ५१ धावा, नामिबिया विरुद्ध ४९ चेंडूत ७० धावा आणि आता स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या अर्धशतकी खेळीनंतर बाबरने पाकिस्तानी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मॅथ्यू हेडनने २००७ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये ४ अर्धशतकं झळकावली होती. आता २०२१ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये बाबरने ४ अर्धशतकं झळकावत या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा