टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आजपासून सुरू झाली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठ्या सामन्याकडे आहेत. २४ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. या सामन्याने भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारत-पाकिस्तानचे माजी खेळाडू एकमेकांशी मजा-मस्ती करताना दिसून आले. यादरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंना मसाजही दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब अख्तरने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासोबत मजा करताना दिसत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासही दिसत आहेत. फोटो शेअर करताना शोएबने लिहिले, “सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह मजा करत आहे. झहीर अब्बास, सुनील गावसकर आणि कपिल देव. आम्ही क्रिकेटच्या महान सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”

हेही वाचा – T20 World Cup : पाकिस्ताननं आपली ‘चूक’ सुधारत लाँच केली नवी जर्सी!

शोएबने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो गावसकर आणि कपिल देव यांच्या खांद्याला मालिश करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असून या फोटोंना चाहत्यांनीही पसंती दर्शवली आहे.

भारत आणि पाकिस्तान दोन वर्षांनंतर समोरासमोर असतील. यापूर्वी दोन्ही संघ २०१९च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते. यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. टीम इंडियाने टी-२० विश्वचषकातील सर्व पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. २००७ मध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. याशिवाय टीम इंडिया २०१२, २०१४ आणि २०१६ मध्ये जिंकण्यातही यशस्वी झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc pakistans shoaib akhtar gives massage to former indian players photos went viral adn