टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. वर्ल्डकप सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. आज पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना होत आहे. पाकिस्तानचं पारडं या सामन्यात जड आहे. मात्र ऑस्ट्रेलियासोबतचा सामना वाटतो तितका सोपा नसेल, याची जाणीव पाकिस्तान संघाला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बाबर आझम बाबत मोठं विधान केलं आहे. एका शोदरम्यान हरभजन सिंग आणि शोएब अख्तर एकत्र आले होते. यावेळी शोएब अख्तरने आपलं मत मांडलं.

“जर आपण बाबरचं मागच्या एका वर्षातील कर्णधारपद पाहाल आणि या महिन्यातील कर्णधारपद पाहाल, तर बाबरला भूमिका बजावण्यास दिली आहे. आता त्याला चिठ्ठ्या पाठवल्या नाहीत. हे पण सांगितली नाही की, तू व्यक्त होऊ शकत नाही”, असं शोएब अख्तरने सांगितलं. शोएब अख्तरच्या या वक्तव्यानंतर हरभजन सिंगला हसू आवरलं नाही. तर शोएबही हसू लागला. दरम्यान शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सामन्यापूर्वी शुभेच्छाही दिल्या.

Jasprit Bumrah Historic 5 Wicket Haul in Perth Test Equals Kapil Dev Record in Sen Countries IND vs AUS
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहची पर्थमध्ये ऐतिहासिक कामगिरी, कसोटीत दिग्गज कपिल देवच्या विक्रमाची केली बरोबरी
Jasprit Bumrah break Wasim Akram record in IND vs AUS Perth Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा…
Harshit Rana angers Mitchell Starc with bouncer barrage video viral
Harshit Rana vs Mitchell Starc : ‘मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी…’, हर्षित राणाचा बाऊन्सर पाहून मिचेल स्टार्कने दिली धमकी, VIDEO व्हायरल
IND vs AUS Australia All Out on 104 Runs 4th Lowest Score Against India in Test Cricket Jasprit Bumrah 5 Wickets
IND vs AUS: भारताचं ऐतिहासिक पुनरागमन, ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात भारतासमोर सर्वात नीचांकी धावसंख्या; बुमराहची भेदक गोलंदाजी
Hazrat Bilal bowled the biggest no ball in the history of cricket video viral
Hazrat Bilal No Ball : क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा मोठा ‘नो बॉल’ कधीच पाहिला नसेल, फाफ डू प्लेसिसही झाला चकित ; VIDEO व्हायरल
Mitchell Starc Statement on KL Rahul Controversial Wicket on Day 1 IND vs AUS Perth Test
IND vs AUS: “ती विकेट नियमानुसार…”, केएल राहुलच्या वादग्रस्त विकेटवर मिचेल स्टार्कचं मोठं वक्तव्य; नियमाचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाला?
Nitish Reddy reveals chat with coach Gautam Gambhir before IND vs AUS Perth test
Nitish Reddy : ‘जसं तुम्ही देशासाठी गोळी झेलत आहात…’, असं का म्हणाला गौतम गंभीर? पदार्पणवीर नितीश रेड्डीने केला खुलासा
IPL 2025 Auction Time Changes Due to Broadcasters Request To Avoid Overlap With IND vs AUS Perth Test
IPL Auction 2025: IPL महालिलावाची अचानक बदलली वेळ, नेमका किती वाजता सुरू होणार लिलाव? काय आहे कारण?

बाबर आझम सध्या चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत पाकिस्तानने पाचही सामने जिंकले आहेत. तसेच कर्णधार बाबर आझमने ५ सामन्यात २६४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सामन्यापूर्वी मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक या पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका होती. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त झाले असून आज होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी ते उपलब्ध असल्याची बातमी समोर आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे.