टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आज न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड लढत रंगत आहे. या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या शानदात ९३ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने स्कॉलंडसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात न्यूझीलंडचा विजय निश्चित मानला जात असला, तरी स्कॉटलंडने दमदार सुरुवात केली. दरम्यान स्कॉटिश फलंदाज जॉर्ज मुन्सीने केलेल्या एका गोष्टीमुले न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट भडकला.

स्कॉटलंड संघ फलंदाजी करताना तिसरे षटक बोल्ट टाकत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुन्सीने त्याला सुरेख ऑन ड्राइव्ह चौकार खेचला. या चौकारानंतर मुन्सीने बोल्टला डोळे वटारले. भडकलेल्या बोल्टने प्रत्युत्तरात ”हा चौकार तुझ्या कॅमेऱ्यात कैद कर”, अशा आशयाची कृती केली. बोल्ट-मुन्सीचे हे द्वंद्व सोशल मीडियावरही चर्चेचे ठरले आहे.

हेही वाचा – १४ वर्षानंतर सेहवागचा खुलासा..! २००७ वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीसाठी ‘या’ व्यक्तीला धरलं जबाबदार

आठव्या षटकात फिरकीपटू ईश सोधीला मुन्सीने दोन षटकार ठोकले. मात्र सोधीने बदसा घेत त्याला तंबूत धाडले. मुन्सीने २२ धावा केल्या. स्कॉटलंडनं आतापर्यंत दोन सामने गमावले आहेत. तर न्यूझीलंडने एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

Story img Loader