टी २० वर्ल्डकपमध्ये बायो बबल नियमांचं उल्लंघन केल्याचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. इंग्लिश पंच मायकल गॉफ यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक चांगले पंच म्हणून मायकल गॉफ यांची ख्याती आहे. मात्र बायो बबलचे नियम मोडल्याप्रकरणी गॉफ यांच्यावर ६ दिवसांचा प्रतिबंध लावण्यात आला आहे. गॉफ यांना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सहा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये त्यांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास त्यांना पंच म्हणून काम करता येणार आहे. दरम्यान, आयसीसी अधिकारी याप्रकरणी आणखी चौकशी करत आहे.

पंच मायकल गॉफ यांनी आपल्या हॉटेलबाहेर काही व्यक्तींची भेट घेतली होती. मायकल गॉफ यांनी रविवारी भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचाची भूमिका बजावली होती. मात्र त्यानंतर इतर सामन्यात त्यांची जागा दक्षिण आफ्रिकेच्या मरायस एरास्मस यांनी घेतली. “बायो बबल सुरक्षा सल्लागार समितीने पंच मायकल गॉफ यांच्यावर ६ दिवसांचा प्रतिबंध लावला आहे. कारण त्यांनी बायो बबल नियमांचं उल्लंघन केलं आहे”, असं आयसीसी प्रवक्त्यांनी सांगितलं. दरम्यान मायकल गॉफ यांना उपांत्य आणि अंतिम फेरीत पंच म्हणून रोखण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मैदानात आरडाओरड करुन, सतत रिअ‍ॅक्ट होऊन हे सिद्ध होत नाही की…; गौतमची कोहलीवर गंभीर टीका

करोना संकटामुळे भारतात होणार आयसीसी टी २० वर्ल्डकप दुबईत आयोजित करण्यात आला आहे. तसेच करोनाचं संकट पाहता कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीवरही बंधनं आहे. करोना संकट टाळण्यासाठी प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी वेगवेगळे बॉक्स बनवण्यात आले आहेत. या व्यवस्थापनाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होते. सोशल डिस्टन्सिंगसाठी लाकडी बॉक्स बनवण्यात आले आहे. बॉक्समध्ये चार ते पाच व्यक्तींना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

Story img Loader